सोमप्रदोष
जाणून घेऊया हिंदू धर्मातील श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमप्रदोष व्रताचे महत्त्व
हिंदू धर्मात अनेक व्रतकैवल्य अतिशय भक्तीभावाने केली जातात. सुख, समाधान, शांती यासाठी केला जाणारा या व्रतामध्ये सोमप्रदोष व्रताचे ही तितकेच महत्त्व आहे.तर जाणून घेऊया श्रावण महिन्यातील आलेल्या सोमप्रदोष व्रताचे महत्त्व...प्रदोष म्हणजे त्रयोदशीला सूर्यास्तानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ. यंदा हा काळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी येत आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष म्हटले जाते. सोमप्रदोष व्रताचा मुहूर्तदिनांक २८ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजून १० मिनीटे ते ८ वाजून ३० मिनीटे असा असून पूजा विधी या या पद्धतीने पार पाडावी...
या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवपूजा करावी. शिवलिंगावर बेल व्हावे.जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महाकाल शंकराच्या महामृत्यूंजय जपाचेही पठण करावे.या काळात पूजा करणे अधिक शूभ मानले जाते. हा श्रावणी सोमवार असल्याने या तिथीचे महत्व दुपटीने वाढले आहे. त्यामुळे यानिमित्त तिळाची शिवामूठ वाहून सोम प्रदोषाचे व्रत करा.
प्रदोष व्रत वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, #प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व इच्छांची पूर्तता होते, असं मानलं जातं. #सोम #प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. पौराणिक कथा असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा. अशा पद्धतीने व्रत केल्याने आयुष्यात सुख शांती व समाधान मिळेल.
--
शिवस्वामी भक्त अनिलदारा :सुनंदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा