जय हरि माऊली
आज आपणास #कुलदेवीची भाग बांधणी कशी करावी ते पाहु...
तुमच्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी व #कुलदेव, कुलदेवी यांची कृपा होणेसाठी, कुलदेव,कुलदेवी बंधनातून मुक्त होणेसाठी, लग्न न होणे, पतिपत्नीतील वाद, अपत्य न होणे, नोकरी न लागणे, आर्थिक बंधन, कर्जे वाढत जाणे, अश्या विविध कारणासाठी एक सोपा उपाय आज आपणास सांगत आहे.
हजारो रुपये खर्च करून जो फायदा होणार नाही. तो या सध्या गोष्टीने होईल फक्त तुमची मनापासून श्रद्धा हवीये बाकी काही नाही.
भाग बांधनीसाठी वस्तू:-
१) हिरवे/पिवळे/लाल यातील एक कापड
२) खाऊची पाने तीन किंवा पाच
३) एक नारळ
४) ओटीचे साहित्य हळकूंड, बदाम, खारीक वैगरे
५) एकशे एक रुपया
६) तांदूळ, गहू दोन मुठी
भागबांधनीची #पद्धत :-
कुलदेव कुलदेवीचा वार किंवा अमावश्या-पौर्णिमा किंवा एखादा शुभ दिवस पाहून वरील सगळे साहित्य एकत्र घेऊन, संध्याकाळी अंघोळ करून देवापुढे पाटावर कापड अंथरावे. त्यावर तांदूळ ठेवून, तांदळावरती नारळ ठेवायचा असून, नारळावरती रुपये ठेवून, त्यावर पान सुपारी ठेवावी,
नारळाचे बाजूला ओटीचे साहित्य ठेवून, हळदकुंकू गुलाल भंडारा वाहून तुमची जी अडचण इच्छा आहे ती बोलावी, आहे ती पूर्ण झाल्यावर तुझ्या मुळ ठिकाणी सहकुटुंब दर्शनास येईल असे बोलावे. त्यास दिवा अगरबत्ती लावून, ते साहित्य एकत्र बांधून कोठेतरी भिंतीला किंवा देव्हाऱ्याजवळ बांधून ठेवावे.
त्या वस्तूला कुलदेवी चा भाग बांधलाय तुझा म्हणून प्रार्थना करायचे जो त्रास आहे त्यातून मुक्त कर मार्ग दाखवा म्हणून. अगरबत्ती दिवा ओवाळून कुलदेवी नाव घेऊन ते गाठोड बांधून देव्हाऱ्याच्या बाजूला किंवा कुठेतरी बाजूला बांधून ठेवणे.
त्याला रोज संध्याकाळी अगरबत्ती दाखवणे तुमचा मार्ग मोकळा झाला प्रगती सुरू झाली. ते सगळं घेऊन कुलदेवी, कुलदेवता च्या मुळ स्थानी जावुन तिचा विधीवत मानसन्मान करावा.
जेव्हा तुमची #मनोकामना पूर्ण होईल तेव्हा देवाला जाताना वरील भाग बांधलेले साहित्य ते साहित्य सर्व अर्पण करावा.
।।श्री स्वामी समर्थ।।
ऋषीदास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा