मूळपुरुष म्हणजे कोण ?
आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.
मुळपुरुष म्हणजे ज्याने आपल्या कुळाची रचना केली. ज्या एका पुरुषांमुळे आपल्या कुळाची वंशवेल वाढली. ज्या एका पुरुषामुळे या कुळातील समुह तयार झाला, त्याला त्या " कुळातील मुळ पुरुष" म्हणतात.
अशा मुळ पुरुषाने ज्या देवी / देवतांची आराधना / उपासना केली की ज्या मुळे वंशवेल वाढली ते त्या कुटुंबाचे आराध्य किंवा कुळ दैवत असते. मग जरी हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कितीही दुर स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती, म्हणून त्या कुळ देवते मुळे एकत्र बाधंलेले असतात.
स्वर्गवाशी झालेल्या पितरामार्फत तुमची गाऱ्हाणी मुळपुरुषांकडे जेव्हा मांडतो, तेव्हा मुळपुरुष ती गाऱ्हाणी कुळदेवते कडे मांडते. "मुळपुरुष" हा कुळ देवतेच्या जवळ असतो, त्यामुळे कुळदेवतेचे दर्शन म्हणजे आपल्याला मुळपुरुषांचे पण दर्शन होते व संतती, सुख, समृद्धी लाभते असे कथानक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा