जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे विशेष महत्त्व...
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेच्याच दिवशी महाराष्ट्रात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो.
साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे.शुभ मुहूर्त - सकाळी ६.३६ ते ८.४७ आणि दुपारी ३.२२ ते संध्याकाळी ५.३३आजच्या दिवशी शुभकार्य करणे अथवा औक्षण करणे यासाठी सर्वाधिक शुभ वेळ ही मर्यादीत तासांची आहे, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेच्याच दिवशी महाराष्ट्रात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे. नवीन लग्न झाल्यानंतर त्या वर्षी येणारी पहिली दिवाळी विशेष असते. मुलीच्या माहेरी हा दिवाळसण साजरा करतात. जावयाला विशेष मान देऊन आहेर केला जातो. दिवाळी पाडव्याला पहाटे पत्नी त्याच्या पतीला सुगंधी तेल लावून, उटणं लावून स्नान घालते. संध्याकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून काही तरी भेटवस्तू देतो.
वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी कायम नांदावी, नात्यातला गोडवा कायम राहावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षणाची पद्धत आहे. तसंच घरातल्या अन्य पुरुषांनाही त्यांची पत्नी या दिवशी ओवाळते. फटाके वाजवले जातात. गोडधोड केलं जातं. मुलीच्या सासरकडच्यांना माहेरी जेवायला बोलावण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. अनेक जण या दिवशी आवर्जून सोनं खरेदी करतात. रांगोळ्या काढल्या जातात, पणत्या लावल्या जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा