श्रावण शुद्ध पंचमीतला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी...
कोल्हापूर: हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते.भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
श्रावण महीन्यातील शुद्ध पंचमीला येणारा, पहीला महत्वाचा सण म्हणजे “नागपंचमी” च्या दिवशी हाच नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पंचमी तिथी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता समाप्त होईल. #नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे 5.53 ते 8.30 अशी असेल.ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून #नागदेवतेला प्रसन्न करतात.
दूधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते. भगवान शंकरांच्या कपाळावर #चंद्र विराजमान आहे. चंद्र हा मनाचा ग्रह आहे. मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला #दूध अर्पण करतात. नागाला #शंकर देवांचा सेवकही म्हटले जाते. #नाग भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान आहे. असं मानलं जातं की नाग पृ्थ्वीला संतुलित करतात. त्यामुळे नाग पूजनाला पुराणात महत्त्व आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा