हिंदू धर्मातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी स्त्रियांनी चिकित्सक असले पाहिजे...
हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म वा जीवनपद्धती होय.आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा हिंदु असा उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ 'शाश्वत मार्ग' असा होतो.निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता – आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात.
अशातच उल्लेख करणे महत्त्वाचा आहे ते हिंदू धर्म आणि स्त्रिया याबद्दल...
अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे, की ज्याचा कोणीही संस्थापक नाही. पण यातील अशीच एक बहुचर्चित प्रतिमा म्हणजे ‘हिंदू स्त्री.’ काळाच्या ओघात केवळ ‘चूल आणि मूल’ एवढीच मर्यादित कामे न करता स्त्रियां या चाकोरीतून मुक्त झाल्या. असा उदारमतवादी विचार हिंदू समाजाने स्वीकारला असला, तरीदेखील लौकिक अर्थाने स्त्रियांवरच्या जबाबदार्या आणि सामाजिक बंधने अजून तशीच आहेत. वानगीदाखल दिली जाणारी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा आणि उभयभारती अशी काही उदाहरणे वगळता प्राचीन काळातदेखील स्त्रियांच्या चरित्र गौरवाची फारशी उदाहरणे आपल्याला आढळत नाहीत.
धर्माच्या व्याख्येनुसार प्रत्येक हिंदू स्त्री ही 'देवावरील श्रद्धा आणि तज्जन्य विधी'. विशिष्ट ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्यावर आधारित तत्वप्रणाली, जीवनप्रणाली याचा मनापासून स्वीकार करते. पण हळूहळू या गोष्टी कुठेतरी कमी व्हायला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत तथ्य आणि वास्तव शोधण्याच्या नादात हिंदू स्त्रियांचा धर्माकडे बघण्याचा कल थोडासा बदललेला दिसत आहेत पाश्चात्य संस्कृतीची भुरळ पडलेल्या आपल्या पिढीला केवळ स्त्री हीच पुन्हा हिंदू धर्माचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून त्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी पुढे आणू शकते... त्यामुळे वेळोवेळी हिंदूधर्म चिकित्साही स्त्रियांसाठी फार महत्त्वाची ठरू शकते..
आज प्रत्येक भारतीय स्त्रियांनी किंवा हिंदू स्त्रियांनी हिंदू धर्माबद्दल नियमित चिकित्सा करणे गरजेचे असून हिंदू धर्मातील अनेक गोष्टीचे पालन करत असताना ती गोष्ट नेमकी का घडते याची चिकित्सा होणे याच्याबद्दल माहिती होणे फार गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक हिंदू स्त्रीने त्यातील बारकावे माहीत करून घेणे आवश्यक आहे.
भारतीय समाज आणि भारतीय संस्कृती आणि त्यातील व्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी व त्यासाठी सतत कार्यरत असणारी स्त्री ही हिंदू स्त्रीची साधारण प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.धार्मिकदृष्ट्या सर्व प्रकारच्या धर्मांनी आचरणाची एक विशिष्ट चौकट समाजस्वास्थ्यासाठी घालून दिलेली आहे आणि त्यात स्त्रियांना कायम दुय्यम स्थान देऊन त्यांच्यासाठी नीतिनियमांची चौकट अधिक बळकट केली आहे.
धर्म आणि स्त्रिया या विषयाचा आवाका काही शब्दांत वर्णन करण्याजोगा नाही. धर्माबरोबरच जाती, वंश, सामाजिक स्थान, भौगोलिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा प्रभाव स्त्रियांच्या प्रतिमेवर पडत असतो. त्यासाठी प्रत्येक हिंदू स्त्रीने हिंदू धर्माचा अभ्यास करणे आणि त्यावर चिंतन करून चिकित्सकृतीने हिंदू धर्मातील पैलू वर प्रकाश टाकने फार महत्त्वाचे बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा