वास्तूशांतीसाठी
पूजा साहित्य
|| श्री गणेश:य नम: || श्री कुलदैवत जोतीबा देवताभ्यो नम ||
प्रत्येकाची काही स्वप्ने
असतात. त्यापैकी एक म्हणजे स्वतःच घर. प्राप्त झालेली वास्तू आपल्याला लाभणही
तितकच महत्वाच आहे. त्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे फार महत्वाचे आहे. वास्तु
निर्माण करताना किंवा वास्तुमध्ये पूर्वी निवास करणार्या व्यक्तिंद्वारे काही अपकर्म
घडल्याने निर्माण झालेले जे दोष, बाधा इ. यांच परिमार्जन होण्यासाठी आपण राक्षोघ्न +
वास्तुशांत करतो. वास्तुशांती करण्यासाठी वैशाख, पौष, फाल्गुन , श्रावण, मार्गशीर्ष, जेष्ठ, कार्तिक, माघ हे महिने योग्य आहेत. या महिन्यातील मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, स्वाती, शततारका, हस्त, पुष्य, धनिष्ठा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, ही नक्षत्रे योग्य होय. रविवार व मंगळवार हे दोन वार
मात्र वर्ज्य आहेत. वास्तुशांती तसेच गृहप्रवेश करण्यासाठी यजमानांच्या
जन्मकुंडलीनुसार लाभणारा मुहूर्त घेणे जास्त हितावह आहे. वास्तु प्राप्त झाल्यावर
त्यामधे सुख, शांती नांदावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी
आपले प्रवेशद्वार कायम सज्ज असावे, यासाठी आपल्या घराचा दरवाजा मंगलचिन्हांनी सजवावा.
कलश, कमळ, ध्वज, चक्र, छत्र, श्रीफळ, पाने, वेली यांचा वापर करून आपण आपल्या वास्तूचे मुख्यद्वार
सुशोभित करू शकतो.
पूजा साहित्य :
हळद- कुंकू, गुलाल, बुक्का,
अगरबत्ती, अत्तर, जानवीजोड, धूप, लहान सुपार्या १५०, मोठ्या सुपार्या
६, नारळ११, पानविडे
३१, नाणी ५१ रू., शुद्ध खव्याचे पेढे अर्धा किलो, तांदूळ
५ किलो, गहू५ किलो,सात धान्य, केळी २.५ डझन, फळे, आंब्याची
डहाळे, दूर्वा, आघाडा, गूळ-खोबर, भेंड-बत्तासे,
चणे-फुटाणे,
बदाम
21, अगरबत्ती, कापूसवाती, गाईचे तूप 250ग्रॅम,
दही,
कापुर 50 ग्रॅम, धने 125 ग्रॅम, फुले किमान 1
किलो, दही, 5 तांबे, श्री दत्त
मूर्ति किंवा श्री प्रतिमा, शिवलिंग, तुळशीपत्र,
बेल,
रांगोळी,
धागा, दारावर तोरण, समई, तेल, निरांजन तूपाची फुलवात, ४ लोखंडी खिळे,
बेलफळ(मिळाल्यास), केरसुणी, नवे सूप, गव्हाचे पीठ सव्वा किलो,पंचामृत, काळे उडीद १०० ग्राम, गाईचे
शेण,गोमुत्र १ तांब्या किंवा १ लिटर, पोवळा व समुद्राचे शैवाळ(उपलब्ध झाल्यास), वास्तूपुरुष चित्र किंवा प्रतिमा, बदाम १००
ग्राम, आक्रोड१०० ग्राम, पत्रावळ्या-द्रोण
नवे शिबाड, नवग्रह प्रतिमा, ३ वाटीचा दुध घालून केलेला भात, दुध इत्यादी.
नवे शिबाड, नवग्रह प्रतिमा, ३ वाटीचा दुध घालून केलेला भात, दुध इत्यादी.
वस्त्रे : ब्लाऊज पीस ५,
टावेल
टोप्या२, साडी १, सौभाग्यवतीचे लेण (आरसा,
फणी, कुंकवाचा करंडा, काजळ डबी, मणी मंगळसूत्र, हिरवा चुडा इत्यादी) धोतर, उपरणे, गुरुजींना उलपा
देण्यासाठी पेहराव, आई-वडील यांच्यासाठी कपडे, यजमानास नवीन कपडे.
वस्तू : लाकडाचे/चांदीचे/सोन्याचे
पाट-७-५, तांब्याचे तांबे ५, ताम्हन २, पळी पंच पात्र२, हळद-कुंकुसाठी छोट्या
४-५ वाट्या, ३-४ ताटे फुले व इतर सामान ठेवण्यास, पंचरत्नाचे खडे (असल्यास),
सोन्याची शलाका (बारीक तार) पंच धातूचा तुकडा.
हवन सामग्री : सर्व सामग्रीत
सर्वात जास्त काळे तिळ 250 ग्रॅम, पिवळी मोहरी 150ग्राम(पिवळी
नसल्यास काळी चालेल, तांदूळ, १ किलो, कोळसा १
किलो, गायीचे तूप १/२ किलो, गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५,
उंबर,
आंबा,
वड,
पिंपळ,
चिंच,
कडू
निंब, औदूंबर, देवदार इत्यादिच्या वाळलेल्वीया वीत-वीत भर कांड्या..
यज्ञासाठी : १६ नव्या विटा,
वाळू
एक पाटी, माती एक एक पाटी इत्यादि
आचार्य : प.पू. श्री. जग्गनाथ स्वामी
प.पू. श्री जगगनाथ स्वामी मठ द्वारा अमर
स्वराज्य रूरल डेव्हल्प्मेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट
पोस्ट गट नंबर ३०४/ब, हमीदवाडा माळ, पोस्ट बस्तवडे
ता. कागल, जि. कोल्हापूर 416235
WP 8208948896 | swamijagganath@gmail.com | https://shreejagganathswamimath.blogspot.com/p/blog-page.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा