★दारवंटा विद्या ★
नाथपंथा मधील दारवंटा विद्याच एक आगळ वेगळं स्थान हे ग्रामीण भागात आहे ही विद्या खडवाई व वरवंटा च्या प्रकारातील आहे ह्या विद्येच वैशिष्ट्य कोणत्याही क्षेत्रातील मुख्य प्रधानशक्ती,क्षेत्रपाल,दैत्य व शत्रूला दगहा करून सोडल्या जातात म्हणजे वजना खाली चेपवल्या जातात व असाह्य झाल्यावर त्यांच्या कडून वचन घेऊन सोडवल्या जातात व इच्छित कार्य करून घेतले जाते दारवंटा विद्याची देवता ही यबीदेवताच्या साह्याने चालवली जाते ही पंचस्वरूपातील देवता आहे तसेच खाल्या व पाल्या हे दैत्य असून ह्यांच आत आणि बाहेर व खाली व वर परस्पर विरुद्ध अस मुख्यस्थान आहे दारवंटा विद्या ही दगडाच्या साह्याने चालवली जाते ती अशी एका छोट्या दगडात एक डोगर, दोन डोंगर,चार ते आठ डोंगरांचा भार यबीदेव तेच्या साह्याने टाकतांना विशिष्ट विधी करून नंतर हे दगड त्या विशिष्ट शक्तीवर सोडले किव्हा त्या क्षेत्रात टाकले असता त्यांच्यावर छोट्याश्या दगडात डोंगरा येवढ्या वजनाच्या प्रभावाने ती शक्ती चेपल्या जाऊन तिचा प्राण कासावीस केला जातो व त्यांच्या कडून कार्य करून घेण्यासाठी व दैत्यांना घायाळ करण्यासाठी, स्व रक्षणासाठी सुद्धा वापरली जाते ह्यात दारवंटात अनेक प्रकार आहेत गावचा खेतर,खोतर,गावहाट,डोक्याचा,तोंडाचा,हाताचा, पाठीचा,पायांचा दारवंटा केला जातो...जर एखाद्या गावातील मांत्रिक विद्या चालवत असेल तर त्याच्या मुखाचा दारवंटा केलाजातो जेणे करून त्याची जीभ जड होऊन निर्वंश होतो तसेच गावहाट,खेतर,खोतरचा दारवंटा करण्यासाठी तीन आणि पाच दगडांचा खेळ खेळला जातो तसेच एकाद्या गावात प्रवेश करतांना क्षेत्ररक्षक मूळे काहींना चकवा होतो ते टाळण्या साठी गाव वेशीत एक दगड टाकला जातो तसेच एखाद्या शक्तीचा किव्हा शत्रूचा हाताचा पायाचा दारवंटा करून त्याचे जसे जसे भार टाकून वाढविल्यास तसे तसे भाराद्वारे त्याची गती मंदावते व पूर्ण भार टाकल्यास तो एक जागेवर खेळून राहतो याचा जास्त वापर विद्यावान चाळ्यात करतात त्याचा खेळ चालू केल्यास तो उचलत नाही असोतर ह्या विद्येचा अनेक प्रकारे वापर केला जातो.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★कानिफनाथांनी आपल्या शिष्याला दारवंटा केलाचा संदर्भ★
कानिफानाथ सातशे शिष्य घेऊन ते फिरत फिरत गुरू जालिंदर नाथ यांचा शोध घेण्यासाठी स्त्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही, हे सर्वांना ऐकून ठाऊक होते; म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना. पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली.आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा. ज्यांची गुरूच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल, त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जिवाची पर्वा असेल त्यांनी परत घरी जावे.कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व आनंदाने परत जाऊ लागले.ते गावच्या वेसीपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले.परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले. जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना.इकडे कानिफ नाथाने राहिलेल्या सात शिष्याना सांगितले की, तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत, त्यांच्या पाठीवर दारवंटा एकएक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले. ह्या सात जणांना पाहाताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरूने सांगितल्या प्रमाणे त्यांच्या पाठीवर दारवंटा दगड ठेविले.ते दगडा खाली चेपून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा ते सात शिष्य म्हणले, जिवाची आशा धरून येथे खुशाल रहा, गुरुजी देश पाहून वापस आल्यानंतर तुम्हास सोडवून नेऊ. संकटा पासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणारास तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरूचा प्रताप समजला, असेहि त्यांनी बोलून दाखविले.मग ते सात हिजण परत गुरूकडे येऊन जोडीदारांची स्थिति सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरूला दया येण्या जोगे त्यांनी बरेच मार्मिक याचना केली. तेव्हा गुरू कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्यांनी यबीदेवतेच्या साह्याने दारवंटा तुन मोकळे केले. मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरूच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जावयास निघाले. तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिले.
पुढील भागात वरवंटा विद्या व खडवाई विद्या हिचे मूळ स्वरूप बराटी विषयी पाहूया...
साभार अभि कुमार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा