कडुलिंबाच्या झाडाचे उपयुक्त असे फायदे..
हिंदू धर्मामध्ये कडुलिंबाच्या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे..औषधी आणि कृषी उपयोगांव्यतिरिक्त, कडुनिंबाचे अनेक समाजांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हे हिंदू धर्मात एक पवित्र वृक्ष मानले जाते आणि बहुतेकदा देवी सरस्वतीशी संबंधित आहे. कडुलिंबाची पाने धार्मिक समारंभात वापरली जातात आणि असे मानले जाते की हे झाड वाईट आत्म्यांना दूर ठेवते. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी झाडाचे नेमके फायदे तरी काय...
कडुलिंबाचे झाड हे आपल्या सर्वांचे परिचयाचे असेल. कडूलिंबाचे झाड हे मनुष्याला सर्व रुपी फायद्याचे ठरणारे आहे. भारतात साधारणपणे कडूलिंबाचे झाड सर्वत्र पाहायला मिळतात. तर आपण या लेखांमध्ये कडुलिंबाच्या झाडाचे फायदे पाहुयात...कडुलिंब ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून तिचे खूप सारे उपयोग तुम्ही दैनंदिन जीवनात करू शकता. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे.परंतु माहिती अभावी तुम्हाला त्याचे गुणधर्म व फायदे माहित नसतील तर ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. कडूलिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्यांचे अनेक गुणकारी फायदे आहेत.
कडुलिंबाचा आयुर्वेदिक औषधींमध्ये वापर केला जातो. कडूलिंबाची पाने नव्हे तर या झाडाच्या बिया मुळे फुले साल यामध्ये अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाड गुणकारी असण्याची दिसून येते.
कडूलिंबा मध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयुगे असतात. जे आपल्या शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी मदत करतात निरोगी जीवन जगण्यासाठी पाठबळ देतात.
कडुलिंबाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. जसे कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येकाची शरिरांमध्ये कर्कपेशी असतात. परंतु त्यांचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचा संदेश ग्रहण क्षमता शक्तीग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते. नियमित कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले तर कर्क पेशी संख्या प्रमाणात राहते व कर्करोग रोधक म्हणून काम करते.
कडुलिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि खनिज यांचे मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयोगी असतात.
सांधेदुखी, गुडघेदुखी याचा त्रास असल्यास कडू लिंबाच्या तेलाने नियमित मालिश करावी. या तेलाने मालिश केल्यास स्नायू मधील वेदना, सांध्यातील वेदना व पाठी खालच्या भागाचे दुखणे देखील कमी होते.
कडुलिंब विषाणू प्रतिबंधक म्हणूनही काम करते. कडुलिंब पोलिओ, एचआयव्ही कॉक्सिक बी ग्रुप आणि डेंगू सारख्या अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृत सुरुवातीच्या टप्प्यावर रोखण्याचे प्रयत्न करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा