पण..
हा गंभीर विषय आहे हे आपण जाणूनबुजून विसरतोय आणि आता तर याचे दीर्घकालीन परिणाम दिसायला लागलेत तरीही आपण सुधारायला तयार नाही हे तर त्याहून कठीण आहे..
या मोसमात पौरोहित्य करायला गेलो असता यजमानपत्नी ची ओटी भरायला आलेली सुवासिनी गाऊन घालून आली होती.. ( बऱ्याच जणांना हा अनुभव असेलच ) सुवासिनी अस म्हणायला एक मंगळसूत्र मात्र अंगावर होतं म्हणून तिला सुवासिनी म्हणायला वाव होता.. अन्यथा सुवासिनी म्हणावं असं एकही लक्षण दिसत नव्हतं..
तर त्यांना मी नम्रपणे म्हटलं काही वेळानंतर तुम्ही साडी नेसून या.. तुम्हाला देवांना औक्षण करायचं आहे.. तुम्हाला यजमान ओवाळणी केल्याबद्दल प्रसाद देतील तो घेण्यासाठी म्हणून तुम्ही साडी नेसून या.. त्यांना ते कळलही..
मला वाटलं त्यांना पटलं तर आहे.. पण तयारीच्या गडबडीत राहून जातात अशा गोष्टी.. असा मीही नेहमीप्रमाणे समज करून घेतला..
औक्षणाची वेळ आली तर मी यजमानांना म्हटल त्या वहिनींना बोलवा.. त्या प्रमाणे त्यांनी हाक मारली.. त्या मात्र खोलीतून बाहेर येईनात.. मग यजमानपत्नींनी हाका मारल्यावर त्या आल्या..
त्या येत का नव्हत्या हे कळल्यामुळे सगळेच खजिल झाले.. खर तर अस सगळ्यांनी खजिल व्हावं किंवा अशा धार्मिक प्रसंगात नाराज व्हावं अस मलाच काय कोणालाही वाटणार नाही..
त्या वहिनी बिचाऱ्या कोकण फिरायला आणि सुट्टीत मजा करायला आलेल्या त्यामुळे साडी नेसण्याची वेळ आपल्यावर येईल अस त्यांच्या नियोजनात नसेल बहुतेक.. त्यामुळेच त्यांनी एकही साडी सोबत घेतली नाही..
औक्षण करायला त्या चक्क जमिनीवर लोळणारा मोठ्या आकाराचा फ्रॉक ( त्याला म्हणे वन पिस म्हणतात) घालून आल्या.. त्याला ना पदर ना काय..
काय बोलणार अशा प्रसंगी..
पाश्चात्य कपडे ही एकच बाब नाही तर आपण किती सहज या सगळ्या गोष्टी नित्य आचरणात आणतोय ज्या पूर्वी आपल्या आयुष्यात नव्हत्याच.. किमान आपल्याला नुसतं बघायलाही लाज वाटायची..
भारतातील बऱ्याच हिंदू मंदिरांमध्ये याच आपल्या अतिरेकामुळे भाविकांनी भारतीय वेषातच मंदिरात यावं अशी सक्ती केली आहे.. आणि ते योग्यच आहे..
पर्यटनाने प्रसिद्धीला आलेल्या शहरातच राहतो आणि मंदिराचा पुजारी आहे त्यामुळे मला देखील हा अनुभव येतो की आपण कुठे , कोणते कपडे घालून येतो.. हिंदू आहोत म्हणून डोक्याला गंध, किंवा हळदकुंकू असावं , हातात बांगड्या असाव्यात , पायात पैंजण असावी, केस बांधलेले असावेत अगदीच नाही तर यापैकी काहीतरी एक तरी किमान असावं ना.. पण आपण इतके अवगल्यासारखे वागतोय की आपणाला भानच राहत नाही की आपण काय करतोय , कुठे आहोत , कुठे जातोय , कोणत्या वेळी कोणता वेष असला पाहिजे..
असो.. यावर सर्वांनी विचार करावा म्हणून विचार मांडले..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा