घरात, दुकानात किंवा कार्यालयात
मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा.दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.
ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र.
रोज रात्रौ पूजा केल्यानंतर
किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये,
व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्रय विनाकटकट निघून जाते.
दुध व साखर मिसळलेले
पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.
घरामध्ये सूर्योदय आणि
सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा.
त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही.
उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं.त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.
उपवास करून शरीरशुध्दी होते.
यात्रा करून शरीर बलवान होते.
जप करून मानसिक विकास होतो.
अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते.
धनरत्न जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राह्ते.
दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर लाभते.
वास्तुशास्त्रानुरूप - घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,रत्न वापरल्याने - मानसिक स्थिरता,शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.
पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त
राहील.
आपल्या कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी.तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.
गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे.
गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा.
पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.
लक्ष्मीची साधना, पूजा,
प्रार्थना करताना साधकाचे तोंड
पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे.
कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.
स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.
सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे.
चुकूनही अपशब्द बोलू नये.शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे.
एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी.
हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे.त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हमखास परत मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा