यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
भावार्थ : हे भारत! जब-जब धर्म की हानि और अधर्म की वृद्धि होती है, तब-तब ही मैं अपने रूपको रचता हूँ अर्थात साकार रूप से लोगों के सम्मुख प्रकट होता हूँ॥7॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भावार्थ : साधु पुरुषों का उद्धार करने के लिए, पाप कर्म करने वालों का विनाश करने के लिए और धर्म की अच्छी तरह से स्थापना करने के लिए मैं युग-युग में प्रकट हुआ करता हूँ॥8॥आज भारत देशाला “मधुमेही रुग्णांची राजधानी” म्हणून ओळखले जाते. एका सर्व्हे नुसार प्रति 10 माणसामागे 3 व्यक्ति मधुमेही ग्रस्त आहेत. भारतात केरळ राज्यात सर्वात जास्त मधुमेहाचे पेशंट आहेत. मधुमेहा मुळे व्यक्तीच्या सृजन आणि क्रय शक्तीचा हळू हळू र्हास करते. त्यामुळे आपल्या देशातील मनुष्य बळ वाचवायचे असल्यास याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. याचे गांभीर्य अजूनही आपल्या देशातील लोकांना झाले नाही. मधुमेहा च्या रुग्णामुळे त्या घरातील आर्थिक गणिते बिघडत आहेत. ज्याचा भारत देशाच्या जीडीपी ग्रोथ वर फार मोठा फरक पडतो आहे. पण समाज-प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधून यावर उपाय-प्रतिबंध शोधून निश्चित मात्रा लागू करणे आवश्यक आहे. यासाठीच श्री जग्गनाथ स्वामी(परमार्थिक नाव संबोधन) नी यासाठीच या मठाची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. ह्या अगोदर स्वामींनी याची कारणमीमांसा शोधली टीआर त्यांना प्रकर्षाने जाणवले की निकृष्ट पाश्चात जीवन पद्धतीचा टीव्ही, जाहिरात, चित्रपट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राचीन वैदिक हिंदू जीवन पद्धतीवर झालेला हल्ला होय. ही बाब तथाकथित अधर्मिक लोकांना न्यून वाटेल किंवा भविष्याची चिंता नसणार्या-नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या बेजबाबदार तरुणाईला आऊट डेटेड वाटेल. पण त्या सर्वासाठी जग्गनाथ स्वामी सोदाहरण देतात, ‘ पेट्रोलच्या गाडीत डिझेल घालून चालवली तर चालेल का ? बर चालवली तर चालवली पण तिची गत काय होईल ? तीच अवस्था शरीराची !
माणसाची जीवन पद्धती ही काळ, वेळ, भौगोलिक परिस्थिती,
वातावरण, निसर्गसंस्कृती यावर अवलंबून असते. याच्याशी
अनुकूल असते. वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन ऋषी-मुनींनी आपल्या अखंड भारताला ऋतुमानानुसार साजेशी जीवन पद्धत विकसित करून गोर-गरीब भोळ्या भाबड्या
जनतेला बहाल केली. आपल्या आजूबाजूला असलेली जुनी-जानती
ज्येष्ठ मंडळी आपल्या आयुष्याची शंभरी पूर्ण झाली तरीही धडधाकट असून कोणत्याही गोळ्या आणि औषधाची गरज त्यांना भासली नाही. याचे कारण
म्हणजे त्यांनी जगलेली वैदिक हिंदू धर्मातील संतुलीत आदर्श जीवन पद्धती. म्हणूनच
श्री दत्तगुरूच्या आशीर्वादाने प.पू. जग्गनाथ स्वामी या जीवन पद्धतीला पुनर्जीवित
करण्यासाठी या मठाची स्थापना अमर स्वराज्य रूरल डेव्हल्प्मेंट रिसर्च एंड
इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून करण्याचा संकल्प केला आहे. मठ कार्यात युनो
व जागतिक आरोग्य संघटनेचे सुद्धा सहकार्य घेणार आहेत.
यासाठी प.पू. जग्गनाथ
स्वामीं प्राचीन हिंदू धर्मात सांगितलेल्या जीवनाच्या चार मुख्य घटक ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासश्रमाला
अंगीकार करण्याचा आग्रह केला आहे. आपल्या भक्तांना, अनुयायीना व
समाजाला स्वामींनी “प्रपंचातून परमार्थाकडे चला” असा आदेश-संदेश दिला आहे. स्वामी
सांगतात गृहस्थाश्रमा व्हीआर आपले लक्ष केन्द्रित करणे गरजेचे आहे. साधारणत:
वयाच्या 29-59 वर्षाचा काळ हा धर्म शास्त्रानुसार गृहस्थाश्रमाचा मानला आहे.
गृहस्थाश्रमाची धर्म-कर्म-अर्थ-काम अशी चार कर्तव्ये शास्त्रात विषद केली आहेत. याच
गृहस्थाश्रमाच्या काळात माणसाला मधुमेहा ची व्यक्तीला लागण होत असते.
साधारणत: वयाच्या
तिशीनंतर व्यक्ति आर्थिक ताण-तणावाला अधिक सामोरे जातो. कर्जाचा बोजा, अनावश्यक-अनाठायी सामाजिक दिखाव्यासाठी स्त्री हट्टापायी खर्चामुळे
व्यक्तीवर अदृश्य असा दबाव येतो. वाढलेल्या आर्थिक गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी
व्यक्ति आपल्या शारीरिक क्षमतेची पातळी ओलांडून धावाधाव करून स्वत:च्या शरीराला
वेठीस धरतो. आपली शारीरिक ताकद ताणून ताणून ओढत राहतो आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी
! हीच ती वेळ असते व्यसनांची(अंनैतिकता) लागण होण्याची... अनियमित जेवण(अवैदिक
आहार पद्धत), व्यायामाचा अभाव(ब्रम्हचार्याकडे
दुर्लक्ष) यामुळे व्यक्तीच्या शरीरातील मुळ काम बिघडतो आणि भावनांचा समुच्चय
सुसूत्रता विस्कळीत होऊन व्यक्ति मधुमेहाच्या पंथाला लागते. एकंदरीत काय तर आर्थिक बाबींचे सुव्यवस्थित पणे समायोजन न केल्यामुळे
अदृश्य अशा दबावाखाली आपण सर्वजण जगत आहोत. हे निवारण करण्यासाठी मठ “प.पू. श्री.
जग्गनाथ स्वामी जीवन पंचसूत्री” रूपाने कार्यरत होईल.
1. मधुमेहाचा देशाच्या आर्थिक विकासातील
अडसर ही संकल्पना स्पष्ट करून सर्व संम्मत करणे.
2. धर्म पुरुष- मधुमेह झाल्यावर उपचार
करण्यापेक्षा तो न होऊ नये यासाठी ध्यान-धारणा-अध्यात्म प्रवाहीत संतुलित जीवन
पद्धतीचा पुरस्कार करणे.
3. काम पुरुष- नैसर्गिक वैदिक चरक, सुश्रुत, वाग्भट्ट, शर्ङ्ग्धार, भावमिश्र, माधवा संहितेचा आधार घेऊन मधुमेह रुग्णांना आहार-विहार-पंचकर्म
उपचारांनी कायमचा दिलासा देणे.
4. संन्यास पुरुष- मधुमेह या आजारावर
आत्तापर्यंत तरी ठोस व कायमस्वरूपी इलाज नाही. त्यासाठी संशोधन आणि विकास कार्यक्रम
राबविणे.
5. आर्थिक समायोजन आणि जीवनातील त्याची
सुसूत्रता कळावी, समजावी म्हणून ‘खर्च-उत्पन्न-गुंतवणूक-बचत-पेन्शन’ याबाबत आर्थिक
तज्ज्ञांच्या मदतीने-सल्ल्याने आर्थिक साक्षरता अभियान चालविणे.
!
...असे पूर्ण होईल परम
पूज्य श्री जग्गनाथ स्वामींचे मंदिर आणि मठ !
v पूर्णत्वास येण्यासाठीचा अपेक्षित अंदाजे
काळ ?
अंदाजे 2022 वर्षापर्यंत स्वामींचे मंदिर आणि मठ 100% लोकसहभागातून पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.
v स्वामींचे मंदिर आणि मठ निर्माण करण्याची
जबाबदारी कोणावर आहे ?
स्वामींचे मंदिर आणि मठ निर्माण करण्याची जबाबदारी “अमर स्वराज्य रूरल
डेव्हल्प्मेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट” या संस्थेवर असेल. सदर संस्था 2010
साली स्थापन झाली असून महिला सबळीकरण, शिक्षण, प्रसारमाध्यम आणि आर्थिक साक्षरता साठी काम करते.
v स्वामींचे मठात फक्त हिंदू धर्मियांनाच
मार्गदर्शन मिळणार का ?
हिंदू धर्माने शास्त्र संमत केलेलं पावित्र्य जपून सर्वासाठीच हा मठ खुला
आहे.
v स्वामींचे मठात स्त्रियांना खुला प्रवेश
आहे का ?
नाही. मठात गुरुमाता-गुरुभगिनी-गुरुसखी-गुरुकन्या या चौघीं व्यतिरिक्त
इतर कुणा ही स्त्रीला सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत प्रवेश निषिद्ध आहे. सूर्योदयापासून
सूर्यास्तापर्यंत वडील-पती-मुलगा-भाऊ यांच्या समवेतच स्त्रीला मठात प्रवेश मिळेल.
v मधुमेह आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर
आधारित कार्य करणारे दुसरे कोणते मंदिर आहे का?
भारतातील अशा प्रकारची सेवा-धर्म करणारे हे पहिलेच मठ आणि मंदिर आहे.
v “प.पू.श्री जग्गनाथ स्वामी मंदिर-मठ निर्माण
सहाय्य देणगी” या योजनेत सहभाग घेण्यासाठी किती देणगी देऊ?
फक्त 10,011D (अक्षरी दहा हजार अकरा रुपये फक्त )
v सदर योजनेतील सहभाग हा ऐच्छिक आहे. त्याची
प्रासादिक उपलब्धी खलील प्रमाणे असतील.
Ø प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या उक्ती
प्रत्ययी मठातील प्रत्येक धार्मिक कार्यात सहभागासाठी अग्रक्रम
Ø प्रत्येक स्वामी प्रकटदिन, दर्शन आणि पालखी सोहळ्यात मानाचे निमंत्रण व अग्रक्रम सहभाग
Ø मठाच्या अंतरराष्ट्रीय देणगीदाते यादीत
ज्यांच्या स्मृति प्रित्यर्थ देणगी दिली आहे त्यांचा फोटो नावासहित प्रसिद्धी व उल्लेख
Ø मधुमेह निदान, नैसर्गिक उपचार पद्धती, आयुर्वेदिक उपचार
सहाय्य औषधी आणि वैद्यकीय सल्ला सेवेत सवलत
Ø महान ऋषि कौटिल्य आर्थिक साक्षरता मिशन
अंतर्गत देणगीदाता कुटुंबातील एका सदस्याचे सलग 5 वर्षे आयटीआर फायलिंग संपूर्ण पणे
मोफत
Ø मठाच्या माध्यमातून मधुमेहरहित संतुलित
जीवन व्यवस्थापनेतील ब्रम्हचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या अविभाज्य टप्प्यावर मठाधिपती आणि तज्ज्ञ
लोकांचे अनमोल मार्गदर्शन, सल्ला व सहकार्य आजीवन.
! श्री गुरुदेव दत्त !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा