गुरुचरित्र पारायणाचे रहस्य आणि सप्तदिवसांचे महत्त्व

🌷 गुरुचरित्र पारायणाचे रहस्य आणि सप्तदिवसांचे महत्त्व 🌷

श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तर प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा प्राण आहे. 

या ग्रंथात ५२ अध्याय आणि ७४९१ ओव्या आहेत. 
पण अनेकांना माहिती नसलेले रहस्य म्हणजे गुरुचरित्राचे ७ दिवसांचे पारायण का केले जाते?

गुरुचरित्रातच दत्त महाराजांनी सांगितले आहे की हा ग्रंथ म्हणजे वेदतुल्य आहे. जसा वेदांचा अभ्यास ७ दिवसात पूर्ण होत नाही, पण त्याचे फल ७ दिवसांच्या नियमाने मिळते, तसेच गुरुचरित्राचे आहे.यामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट फलश्रुती सांगितली आहे -पहिला दिवस - पहिल्या ९ अध्यायांचे वाचन. यात श्रीपाद श्रीवल्लभ जन्म आणि अंबरीषाची कथा. यामुळे पितृदोष आणि प्रारब्धाचे विघ्न नष्ट होतात.दुसरा ते पाचवा दिवस - यात १० ते ४२ अध्याय. यात सर्व व्रत-वैकल्ये, अनसूया, सोमवती, गाणगापूर महात्म्य. याने कुटुंबातील कलह आणि रोग दूर होतात.सहावा दिवस - ४३ ते ४९ अध्याय. यात भक्तांच्या कथा आहेत. याने शत्रूबाधा आणि भय नष्ट होते.सातवा दिवस - ५० ते ५२ अध्याय. यात अवधूताची आणि सायंदेवाची कथा. या दिवशी गुरुचरित्रात सांगितले आहे -सप्ताह करिता पावन l होय त्याचे कुळ संपूर्ण l
इहलोकी सुख भोगोन l अंती सद्गती पावे llअनेक लोक विचारतात की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का? तर मूळ पोथीत ३७ व्या अध्यायात स्पष्ट म्हटले आहे - "स्त्रियांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये, तर त्याचे फल पतीस मिळते." म्हणूनच दत्त माहात्म्य हा ग्रंथ स्त्रियांसाठी स्वतंत्र निर्माण केला गेला, जो गुरुचरित्राचाच अर्क आहे.म्हणूनच गुरुचरित्राला कामधेनु म्हटले आहे. जसे कामधेनु सर्व इच्छा पूर्ण करते, तसे हा ग्रंथ भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण करतो, पण नियमाने आणि श्रद्धेने.

 || श्री गुरुदेव दत्त || 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

राम कृष्ण हरी
Shree Swami
Shree Swami

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा