हिंदू धर्मातील चौथ्या श्रावण सोमवारचे अनन्यसाधारण महत्त्व...

हिंदू धर्मातील चौथ्या श्रावण सोमवारचे अनन्यसाधारण महत्त्व...


आज चौथा श्रावणी सोमवार.. हिंदू धर्मात या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहिले जाते. हा शेवटचा श्रावण सोमवार आहे. त्यामुळे चौथा श्रावणी सोमवारचा उत्साह द्विगुणित होत आहे. जाणून घेऊया पूजा विधी.
श्रावण सोमवारी शिवपूजन करताना पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही आपण पूजा करू शकतो.

विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहावी. चौथ्या श्रावणी सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।', असा मंत्र शिवामूठ वाहताना म्हणावा. ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नसेल, त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते.
admin
admin

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा